धुळे शहरात चोरीचे सत्र सुरूच ; शेतकऱ्याच्या घरातून हजारोंचा माल लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे प्रतिनिधी । शहरात गेल्या महिन्या भरापासुन चोरी सञ सुरुच आहे . बंद घरांना लक्ष करुन चोरटे हात साफ करत आहेत . शहरातील मोहाडी उपनगरातील बि.एस.एन. ऑफिसच्या पाठिमागे असलेल्या शिवानंद कॉलनीतील फ्लॅट नं.8 मध्ये राहणारे व्यवसायाने शेतकरी असलेले सुरेश नथ्थु हिरे काही कामा निमित्त बाहेर गावी गेले होते. याच दोन दिवसा दरम्यान बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दाराचा कडीकोंडा तोडुन घरात प्रवेश करुन लोखंडी कपाट फोडुन चोर कप्प्यातील 60,000 रुपये किंमतींची सोन्यांची चौकोनी पट्टे असलेली पोत,10,000 रुपये किंमतीचा एक. एल. ई. डी स्क्रिन टिव्ही,4000 रुपये किंमतींची देवाची पितळी मुर्ती व घरातील पितळी भांडी असा एकुण 74,000 हजार रुपयांचा माल चोरट्यांने चोरुन नेला.परगावाहुन हिरे परत आल्यानंतर त्यांना घराचे दार उघडे दिसले. यावेळी त्यांचे लक्षात आले की आपले घरात चोरी झाली आहे.

Untitled design (88).jpg

हिरे यांनी चोरी बाबत मोहाडी पोलीसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी पहाणी केली.अधिक तपास कामी फिंगर प्रिंट तज्ञ व श्वान पथकाची मदत घेण्यात येते आहे . सुरेश हिरे यांनी दिलेल्या लेखी तक्रारी नुसार आय. एस. ओ. मानांकन प्राप्त मोहाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना.गहिवड करत आहे.

 

Leave a Comment