गौतम अदानी बारामती दौऱ्यावर; रोहित पवारांकडून गाडीचं सारथ्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिग्गज उद्योगपती गौतम अदानी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती दौऱ्यावर आहेत. कृषी विज्ञान केंद्रात आयोजित एका कार्यक्रमानिमित्त गौतम अदानी बारामतीला आले आहेत. यावेळी शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अदानी यांच्या गाडीचे सारथ्य केले.

राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, टाटा ट्रस्ट आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे उद्घाटन आज होत आहे. त्यानिमित्त शरद पवार, रोहित पवार, आणि गौतम अदानी एकत्र आले आहेत. शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित या कार्यक्रमाचे उद्घघाटन होणार आहे.

देशातील श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी बारामती विमानतळावर दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले. तसेच कार्यक्रमस्थळी रवाना होताना रोहित पवारांनी यांनी अदानींच्या गाडीचं सारथ्य केल्याने चर्चाना उधाण आले. दरम्यान, कार्यक्रम आटोपल्यावर गौतम अदानी हे शरद पवार यांचे निवासस्थान असलेले गोविंदबाग येथेही जाणार आहेत.

Leave a Comment