न्यूझीलंडनंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे मालिकेला सुद्धा रोहित शर्मा मुकणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी-२० सामन्यात खेळताना रोहित शर्माला झालेल्या दुखापतीमुळे त्याला दौरा अर्ध्यावर सोडावा लागला. दरम्यान, आता मार्चमध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी सुद्धा रोहित शर्मा मुकणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेच्या आगामी भारत दौऱ्यातही न खेळण्याची शक्यता आहे. आफ्रिका दौऱ्यातून आपल्याला विश्रांती द्यावी अशी मागणी रोहितने संघ व्यवस्थापनाकडे केल्याचं समजतं आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचा संघ ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धची वन-डे मालिका खेळल्यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. ज्यानंतर भारत घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेसोबत वन-डे सामन्यांची मालिका खेळेल. याआधी २०१९ साली आफ्रिकेचा संघ कसोटी आणि टी-२० मालिकेसाठी भारतात आला होता. ज्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केला होता.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment