मुंबई इंडियन्सचे खेळाडू भारतासाठी ओपनिंग करणार; रोहितसोबत ईशान किशन सलामीला येणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेस्ट इंडिज विरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा सोबत मुंबई इंडियन्सचा त्याचा सहकारी ईशान किशन सलामीसाठी येईल असे खुद्द रोहितनेच स्पष्ट केले. सलामीवीर शिखर धवन ला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याच्या जागी ईशान किशन सलामीला येईल.

रोहित शर्माने पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. भारतीय संघातील अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आक्रमक सलामीवीर शिखर धवन चा देखील समावेश आहे. तर दुसरा सलामीवीर के एल राहुल हा त्याच्या बहिणीच्या लग्नामुळे उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे ईशान किशन ची सलामीवीर म्हणून वर्णी लागली.

कोण आहे ईशान किशन-
ईशान किशन हा डावखुरा फलंदाज आपल्या आक्रमक फलंदाजी साठी ओळखला जातो. आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळताना त्याने अनेक अविस्मरणीय खेळया खेळल्या आहेत. इशान किशनने गेल्या वर्षी वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पहिल्यावहिल्या चेंडूवर जबरदस्त षटकार ठोकून त्याने साऱ्यांनाच थक्क केलं होतं. त्याच सामन्यात त्याने वन डे पदार्पणात सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रमही नोंदवला होता.