रोहित शर्मा भारताचा वनडे कर्णधार; कसोटीमध्येही मिळाले उपकर्णधारपद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कसोटी संघाचा उपकर्णधारपदही रोहितला देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच रोहित शर्मा ला भारताच्या T 20 संघाचा कप्तान केलं आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट मध्ये ‘रोहित’राज पाहायला मिळत आहे.

भारताचा आगामी दक्षिण आफ्रिका ददौरा 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. दरम्यान दौऱ्यासाठी रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार असेल. आता कसोटी फॉरमॅटसाठी विराट कोहली कर्णधार राहील तर रोहितला टी20 नंतर आता एकदिवसीय संघाचं कर्णधारपदही मिळालं आहे. तर कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणूनही रोहित काम पाहणार आहे.

विराट कोहलीच्या नावावर अनेक चांगले विक्रम आहेत. मात्र आयसीसी इव्हेंटमध्ये त्याची कामगिरी म्हणावी अशी झाली नाही. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वात जिथे टीम गेली तिथे ट्रॉफी जिंकून आली आहे. शिवाय रोहितच्या नावावर आयपीएलमध्ये पाच ट्रॉफी जिंकण्याचा विक्रमही आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडली आहे.

Leave a Comment