दुखापत कसली , रोहित शर्मा ला वगळल्याचीच शक्यता जास्त ; BCCI मध्ये होतंय का राजकारण ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वगळण्यात आले आहे. त्यामुळे देशभर रोहितच्या चाहत्यांची निराशा झाली. बीसीसीआयकडून सांगण्यात आले होते की, रोहित शर्मा दुखापतग्रस्त आहे. त्याची दुखापत पाहता, त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान संघाचा भाग बनवता येऊ शकत नाही . त्याचदरम्यान, रोहीत शर्मा नेट्स मध्ये सराव करत असतानाच फोटो मुंबई इंडिअन्सने आपल्या अधिकृत ट्विटर वर शेअर करून रोहित फिट्टम फिट्ट असल्याचे साऱ्या जगाला दाखवून दिलं. मुंबईकडून असेही सांगण्यात आले की, येत्या आयपीएल सामन्यांमध्ये तो मैदानावर पुनरागमन देखील करेल.

..मग रोहित आत्तापर्यंत मायदेशी असायला हवा होता

रोहित शर्माच्या फीटनेसबाबत बीसीसीआय आणि मुंबई इंडियन्सकडून देण्यात आलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. जर रोहित फीट नाही, तर तो मुंबईकडून कसा खेळेल? सोबतच जर रोहितची दुखापतग्रस्त जास्त गंभीर नाही, तर त्याला पूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून बाहेर का केले आहे?, असे चाहत्यांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. ज्या कसोटी मालिकेसाठी रोहितला वगळले आहे ती क्रिकेट सिरीज डिसेंबर – जानेवारी मध्ये आहे. तोपर्यंत रोहित फिट होणार नाही असे निवड समितीला वाटते का ?? मग जो खेळाडू डिसेंबर-जानेवारी पर्यंत फिट होऊ शकत नाही तो मग आता आयपीएलचा सराव कसा करतोय ?? तो तर आत्ता मायदेशी असायला हवा होता.

दुखापतग्रस्त मयंक अगरवालची निवड कशी केली

रोहित प्रमाणेच मयंक अगरवाल सुध्दा दुखापतग्रस्त आहे. पण तरीही मयंकची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. मग प्रश्न असा आहे की मयंक अगरवाल ने असे कोणते फिटनेस रिपोर्ट दाखवले म्हणून निवड समितीने मयंक ची निवड केली.असाही प्रश्न उपस्थित होतो.

के एल राहुलला उपकर्णधार करणं म्हणजे रोहितच मनोबल कमी करणारं

रोहित शर्मा हा भारताचा उपकर्णधार आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित ला वगळून राहुल ला उपकर्णधार केलं आहे. समजा तोपर्यंत जर रोहित फिट झाला आणि संघात दाखल झाला तरी उपकर्णधार म्हणून राहुल च राहणार कारण संपूर्ण दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि T20 साठी उपकर्णधार म्हणून राहुलची घोषणा केली आहे.

रोहित-विराट वादामुळे रोहितला बाहेरचा रस्ता ???

गेल्या काही दिवसांपूर्वी कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. येवडच नव्हे तर रोहित ने आपल्या ट्विटर अकाउंट वरून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा याना अनफॉलो केलं होतं. नंतर दोघांनी या गोष्टीच खंडन केलं. पण रोहित ला संघातून वगळल्यामुळे हा वाद पुन्हा वर आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like