हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rohit Sharma। २०२३ वर्ल्डकपची ती फायनल मॅच.. समोर मजबूत असा ऑस्ट्रेलियाचा संघ आणि भारताचा झालेला पराभव…. वनडे विश्वचषक जिंकण्याचे रोहित शर्माचे स्वप्न अधुरं राहिलं. त्याच वेळी त्याने ठरवलं होत कि, पुढचा म्हणजे २०२७ चा वनडे वर्ल्डकप जिंकायचाच…. मधल्या काळात रोहित शर्माने भारताला T २० वर्ल्डकप आणि चॅम्पियन ट्रॉफी जरूर जिंकवून दिली, मात्र त्याची नजर होती ती २०२७ च्या वनडे विश्वचषकावर…. परंतु आता रोहितचे हे स्वप्न आता स्वप्नच राहतंय कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच कारण आहे बीसीसीआय…. एका रिपोर्टनुसार बीसीसीआय रोहित शर्माला २०२७ च्या वर्ल्डकप पर्यंत कर्णधार ठेवण्याची शक्यता खूपच कमी आहे.
रोहितच्या वयाची बीसीसीआयला अडचण– Rohit Sharma
२०२७ चा वनडे वर्ल्डकप दक्षिण आफ्रिकेत होणार आहे, तोपर्यंत रोहित ४० वर्षांचा होईल. अशा परिस्थितीत, बीसीसीआय वेगळा कर्णधार शोधू शकते असं एका रिपोर्ट मधून समोर येतेय. खरं तर मागच्या महिन्यात जेव्हा रोहितने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली, त्याच वेळी तो वनडे क्रिकेट मधूनही रिटायर्ड होईल अशी अपेक्षा बीसीसीआयला होती, मात्र कोणत्याही परिस्थितीत २०२७ ची विश्वचषक स्पर्धा जिंकायचीच या उद्देशाने रोहितने वनडे करिअर सुरूच ठेवलं. खरं तर रोहित शर्माने भारतीय क्रिकेट संघाचे दमदार नेतृत्व करत २०२३ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली, त्यानंतर भारताला टी-२० विश्वचषक आणि २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. आता २०२७ चा वर्ल्डकप मध्ये टीम इंडियाला आपल्या नेतृत्वाखाली अजिंक्य करण्याचा प्लॅन रोहितचा होता, मात्र तत्पूर्वीच बीसीसीआय रोहितच्या (Rohit Sharma) स्वप्नाचा चक्काचूर करते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोण असेल नवा कर्णधार?
रिपोर्टनुसार, भविष्याचा विचार करता संघ व्यवस्थापनाला या वनडे टीमचे नेतृत्व एका तरुण खेळाडूकडे सोपवायचे आहे. २०२७ च्या विश्वचषकापूर्वी भारतीय संघ २७ एकदिवसीय सामने खेळणार आहे. ज्यामुळे नवीन कर्णधार तयार करण्याची चांगली संधी मिळेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्माच्या जागी श्रेयस अय्यरला कर्णधारपद मिळू शकते. अय्यरने आयपीएलमध्ये ३ संघांचे नेतृत्व केले आहे आणि मुंबईसाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी देखील जिंकली आहे. तसेच अय्यरच्या नेतृत्वाखालीच यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्सने फायनल पर्यंत धडक मारली होती.