व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कराड : रोटरी अवाॅर्ड्स 2021-22 ‘या’ मान्यवरांना जाहीर; पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते 26 एप्रिला वितरण

कराड : रोटरी क्लब ऑफ कराड तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा अवाॅर्ड देऊन सन्मान केला जातो. या वर्षीच्या रोटरी अवॉर्डचीही घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. दिनांक 26 एप्रिल ला अर्बन बँक हॉल, कराड येथे राॅटरी अवाॅर्ड्स 2022 चे वितरण सोहळा पार पडणार आहे.

रोटरी क्लब कराडचे अध्यक्ष चंद्रकुमार डांगे, वोकेशनल डायरेक्टर अभय नांगरे, कमिटीचे मेंबर्स यांनी यंदाचे राॅटरी अवाॅर्डचे मानकरी जाहीर केले आहेत. उद्योग क्षेत्रात श्री विजय पांडुरंग पाटील, विटा यांची निवड झाली आहे. तर कला क्षेत्रामध्ये चित्रकार श्री सत्यजित वरेकर कराड यांची निवड झालेली आहे. कृषी क्षेत्र श्री मारुती पावशे, जखीणवाडी यांना गौरवण्यात येणार आहे.

तसेच क्रीडा मध्ये श्री जॉर्ज थॉमस, विजय नगर कराड यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये गब्बर ग्रुप कराड व पर्यावरण क्षेत्रामध्ये निसर्ग ग्रुप कराड यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर डॉ. राहूल फासे उपस्थित राहणार आहेत.

सदर पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार दिनांक 26 एप्रिल ला सायंकाळी 6 वाजता अर्बन बँक हॉल, शनिवार पेठ येथे संपन्न होत आहे अशी माहिती रोटरी क्लब, कराड यांनी दिली आहे. यावेळी रोटरी क्लब कराडचे शिवराज माने, अभय पवार, किरण जाधव, गजानन माने, जगदीश वाघ, राहुल पुरोहित ,राजेंद्र कुंडले, प्रबोध पुरोहित , चंद्रशेखर पाटील, वोकेशनल कमिटी मेंबर आणि क्लबचे सदस्य उपस्थित होते.