सामाजिक उपक्रमांनी रोटरी क्लब ऑफ कराडची वाटचाल : डॉ. ओमप्रकाश मोतिपावले
कराड | सामाजिक उपक्रम राबवित रोटरी क्लब ऑफ कराडची वाटचाल सुरू आहे. समाजातील दुर्लक्षित व गरजूंना मदतीचा हात देत क्लबने एक सामाजिक भान जपले असल्याचे प्रशसीय गाैरवोद्गार डिस्टिक गव्हर्नर डॉ. ओमप्रकाश मोतिपावले यांनी काढले.
कराड रोटरी क्लबची बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बरोबर औपचारिक मीटिंग झाली. तसेच वर्षभरातील कामाचा आढावा घेण्यात आला. आयोजित कार्यक्रमांमध्ये ॲड सौ. सविता मोतीपावले, असिस्टंट गव्हर्नर डॉ. राहूल फासे, चेअरमन राहुल कुलकर्णी, संचालक अभिजीत चाफेकर, प्रबोध पुरोहित, गजानन माने, शिवराज माने, बद्रीनाथ धस्के, रामचंद्र लाखोले, सुहास पवार, जगदीश वाघ, राजेश खराटे, रवींद्र देशमुख, किरण जाधव यांच्यासह क्लबचे सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ कराडच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. मुलींची नगरपालिका शाळा क्रमांक 7 व मुलांची नगरपालिका शाळा क्रमांक 12 या दोन्ही शाळांना रोटरी क्लब ऑफ कराडचे सुहास पवार यांच्यातर्फे शालेय उपयोगी वस्तू देण्यात आल्या. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक आलेकरी व गवळी सर उपस्थित होते. रोटरी क्लब कराडने सुरू केलेल्या युट्युब चॅनेलचे उद्घाटन DG ओमप्रकाश मोतीपावले आणि साै. सविता मोतीपावले यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात सौ. रुपाली चंद्रकुमार डांगे, डॉ. भास्करराव जाधव, अभिजीत चाफेकर, कराड नगरपालिकेचे इंजिनीयर एन. आर. पवार, डॉ. राहूल फासे, डॉ. शेखर कोगणुळकर, केतन दोशी, विनायक कलबुर्गी, चंद्रकुमार डांगे, अभय पवार, डॉ. संतोष टकले यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी डॉ. भास्करराव जाधव यांनी लिहिलेले “भास्करायण” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.