राष्ट्रपती भवनात शाही भोजन आणि पार्कमध्ये मौजमजा, तालिबान्यांच्या विजयाचे व्हायरल VIDEO पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबूल । तालिबानच्या राजवटीपासून अफगाणिस्तानातील परिस्थिती बिकट झाली आहे. लोक कसे तरी सर्वकाही मागे सोडून आपला जीव वाचवून देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. परिस्थिती अशी आहे की, लोकं विमानाच्या टायरवरून लटकण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून ते अफगाणिस्तानच्या बाहेरील भागात जाऊ शकतील. दरम्यान, तालिबान्यांचे विजय साजरा करताना आणि आराम करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यातीलच असे काही व्हिडिओ पाहुयात.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये तालिबान लढाऊ हातात बंदुका घेऊन मनोरंजन पार्कमध्ये मजा करताना दिसत आहेत. काहीजण इलेक्ट्रिक बंपर कार चालवताना दिसले. एका वेगळ्या व्हिडिओमध्ये ते पार्कमध्ये घोड्यांवर स्वार होताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तालिबानचे लढाऊ झुलत आहेत.

त्याचबरोबर काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानचे नेते राष्ट्रपती भवनात थांबले आहेत. एका व्हिडीओमध्ये तेथे खाणे -पिणे, विजय साजरा करत आणि विश्रांती घेताना दिसत आहेत.

काही तालिबानी राष्ट्रपती भवनाच्या जिममध्ये पोहोचले आणि वर्कआउट करताना दिसले.

एका व्हिडिओमध्ये एक तालिबानी त्याच्याच भाषेत गाणे गाताना नाचून आनंद साजरा करत आहे.

हे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Leave a Comment