औरंगाबादचे नाव बदलण्यास आरपीआयचा तीव्र विरोध – रामदास आठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा सध्या राज्यात जोरदार चर्चेत आहे. शिवसेनेकडून औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या हालचाली सुरू असतानाच महाविकास आघाडीतील सत्तेचा वाटेकरी असलेल्या काँग्रेसने मात्र यासाठी तीव्र विरोध केला आहे. यावरून आता महाविकास आघाडी मधेच ठिणगी पडली आहे.

दरम्यान, केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंच्या रिपाइं पक्षानेही नामांतरणाला आपला विरोध दर्शवला आहे.औरंगाबादच्या नामांतरणावरुन आता चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसने नामांतराला विरोध दर्शवल्यानंतर आता रिपाइं आठवले गटानेही या नामांतराला विरोध असल्याचं सांगितलंय. रामदास आठवलेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन औरंगाबादच्या नामांतराला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलंय.

https://twitter.com/RamdasAthawale/status/1345640708703571969?s=19

औरंगाबादचे नामांतरवरुन राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. काँग्रेससह आता रिपाइं आठवले गटानेही या नामांतरणाला विरोध दर्शवला आहे. तर, दुसरीकडे भाजपा आणि मनसेनंही संभाजीनगर नाव करण्याची आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. आता, राष्ट्रवादी यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment