प्रसिद्ध लालचंद ज्वेलर्स अँड सन्सला चाळीस लाखांचा गंडा ; आरोपीने सोने विकून फेडले कर्ज.

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : शहरातील प्रतिष्ठित सोने-चांदीचे दालन असलेल्या लालचंद ज्वेलर्स अँड सन्स या बड्या सोने पेढीला चाळीस लाख 18 हजार रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या अमरचंद प्रेमराज सोनी (वय 44) रा.पानदरिबा,औरंगाबाद याच्या विरोधात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हादाखल करण्यात आला.

शहरातील नामांकित सराफा व्यावसायिक उदय सोनी यांची सन-1944 पासून लालचंद मंगलदास सोनी ही फर्म आहे. त्याअंतर्गत लालचंद मंगलदास सोनी जेम्स अँड ज्वेलरी प्रॉडक्ट लिमिटेड नावाने शहरात दोन ठिकाणी दालने आहेत. उदय सोनी यांनी तक्रारीत नमूद केल्यानुसार मागील अनेक वर्षापासून त्यांच्या फर्मसाठी अमरचंद प्रेमराज सोनी हे दागिने तयार करून देतात. त्यासाठी उदय सोनी हे सोन्याची लगड त्यांना देत असे, त्यातून ते मागणीप्रमाणे एल.एम.एस. सोन्याचे दागिने बनवून देत होते. नेहमीच किलो-किलो सोन्याची देवाण-घेवाण असल्याने त्यांच्यात मोठा विश्वास निर्माण झाला होता. मार्च 2021 मध्ये उदय सोनी यांनी अमरचंद सोनी यांना संपर्क करून दिलेली लगड व त्याचे केलेले दागिने व उरलेल्या सोने याचा हिशोब करण्यासाठी बोलावले, तेव्हा अमरचंद्र यांनी मी सध्या राजस्थानला आहे. लॉकडाऊन उघडताच औरंगाबादला येईल, मग शिल्लक सोन्याचा हिशोब करू,असे आश्वासन दिले. उदय सोनी यांनी मे महिन्यात पुन्हा संपर्क केला, तेव्हा त्यांनी पुन्हा तसेच उत्तर दिले. टाळाटाळ वाढत चालल्याने 5 जून रोजी त्यांनी स्वतः हिशोब काढला असता, त्यात 1 एप्रिल 2020 दरम्यान एकूण 3 किलो 279 ग्राम 490 मिलीग्रॅम सोने दिले होते. त्यापैकी त्यांनी 2 किलो 433 ग्रॅम 590 मिलिग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बनवून दिले असल्याचे समोर आले.

आरोपीने सोने विकून फेडले कर्ज..

लॉकडाऊनचे कारण खरे वाटल्याने उदय सोनी यांनी देखील विश्वास ठेवला. जून महिन्यात अनलॉक झाल्याने त्यांनी पुन्हा कॉल केला. त्यावेळी मात्र त्यांनी थेट मी कर्जबाजारी झालो आहे. मी तुमच्या उर्वरित सोन्याची विक्री केली आहे.आता माझ्याकडे काहीच सोने नाही. मला इतरांचे देणे असल्याने मी तुमचे सोने विकून त्यांना पैसे दिले असल्याचे सांगून हात वर करत तब्बल 84 तोळे सोन्याचा अपहार करत फसवणूक केली. उदय सोनी सध्या आजारी असून त्यांच्या डोक्याची मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांच्याकडे तक्रार केली, त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संदीप शिंदे करीत

Leave a Comment