सौरऊर्जा पीव्ही मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंगसाठी 4,500 कोटी रुपये मंजूर, ज्याद्वारे दीड लाख लोकांना मिळेल रोजगार

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी एकात्मिक सौर पीव्ही मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये दहा हजार मेगावॅट क्षमतेची नवीन क्षमता जोडण्यासाठी 4,500 कोटी रुपयांच्या उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजनेला (PLI) मंजुरी दिली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी ‘नॅशनल प्रोग्राम ऑन हाय एफिशियन्सी सौर पीव्ही मॉड्यूल’ साठी 4,500 कोटींच्या PLI योजनेबद्दल तपशील दिला.

ते म्हणाले की,”मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे एकात्मिक सौर पीव्ही उत्पादन प्रकल्पात दहा हजार मेगावॅट क्षमतेची भर पडू शकेल. त्याअंतर्गत सौर पीव्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सुमारे 17,200 कोटींची थेट गुंतवणूक होईल. PLI योजनेतून सुमारे 30 हजार लोकांना थेट आणि 1.2 लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल असे सरकारचे म्हणणे आहे.

त्याचबरोबर टाटा पॉवर गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (JUVNL) साठी 60 मेगावॅट सौर ऊर्जा प्लांट स्थापित करेल. यासाठी कंपनीचे वर्क ऑर्डर JUVNL कडून मिळाले आहेत. हा सामंज्यस करार 25 वर्षे आहे. जानेवारी 2021 मध्ये निघालेल्या टेंडरमध्ये कंपनीने सर्वाधिक बोली लावून हे काम ऑर्डर केले. वीज खरेदी कराराच्या तारखेपासून 18 महिन्यांच्या आत प्लांटचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. टाटा पॉवरचे सीईओ कम एमडी डॉ प्रवीर सिन्हा यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या मते, या प्रकल्पातून दर वर्षी सुमारे 156 मेगा युनिट ऊर्जा उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. यामुळे कार्बन डाय ऑक्साईडचे 156 मिलियन किलोने कमी होईल. या प्रकल्पामुळे टाटा पॉवरची नूतनीकरण क्षमता 4007 मेगावॅटपर्यंत वाढेल.

You might also like