अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि मोहन भागवत यांच्यात भेट; बंगाल निवडणुकीत येणार ट्विस्ट

मुंबई । पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी सकाळी स्वत: मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबई स्थित घरी जाऊन त्यांची भेट घेतली. मंगळवारी पहाटेच ही भेट पार पडली.

बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप एखाद्या चेहऱ्याच्या प्रसिद्ध शोधात असतानाच सरसंघचालक मोहन भागवत आणि मिथुन यांची ही भेट महत्त्वाची मानली जातेय. मिळालेल्या माहितीनुसार, याआधी मिथुन चक्रवर्ती यांनी नागपूरला जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. या दरम्यान त्यांनी भागवतांना आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं. याभेटीनंतर मात्र, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

मिथुन चक्रवर्ती यांनी मात्र या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ‘माझे मोहन भागवतांशी अध्यात्मिक संबंध आहेत. माझी आणि त्यांची भेट लखनऊमध्ये झाली होती. त्यानंतर मी त्यांना जेव्हाही मुंबईत याल तेव्हा आवर्जुन घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं. या भेटीचा कोणताही राजकीय संबंध नाही’ असं मिथुन यांनी स्पष्टीकरण दिलंय.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

You might also like