बाळासाहेबांचे स्मृतिस्थळ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; RSS चे मुंबई पालिकेला पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई येथील शिवाजी पार्कवर असणारे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कारण या स्मृतिस्थळाच्या जागेजवळ असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुंबई महा पालिकेस एक पत्र लिहले आहे. तसेच मृतिस्थळ इतरत्र हलवण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दादर शाखेच्यावतीने महापालिकेच्या दादर विभागाला एक पत्र लिहले आहे. या पत्रातून त्यांनी या स्मृतिस्थळामुळे उपक्रम भरवण्यास अडचण येत असल्याची तक्रारही केली आहे.

काय म्हटले आहे पत्रात?

मुंबई महापालिकेने 1967 सालापासून स्मृतिस्थळाजवळील 1755 चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दैनंदिन शाखा भरवण्यासाठी VLT तत्वावर भाड्याने दिला आहे. शिवाजी पार्क मैदानातील मोकळ्या भूखंडावर 1936 पासून संघाची शाखा भरवली जात होती. त्यानंतर 1967 पासून वर्ष 2021-22 पर्यंतचा मालमत्ता कर देखील भरला आहे. हा भूखंड 1755 चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळाचा आहे. भूखंडाला लागून बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ आहे.

या भूखंडाजवळ स्मृतिस्थळाची व्याप्ती वाढत असल्यामुळे आम्हाला आमच्या ताब्यातील VLT तत्वावरील भूखंडावर आमचे उपक्रम राबविण्यास अडचणी येत आहेत. स्मृती स्थळाची वाढती व्याप्ती लक्षात घेता भूभागाऐवजी शिवाजी पार्क मैदानाजवळील नाना-नानी पार्क जवळील मोकळा पर्यायी भूखंड भाडेपट्ट्यावर जागेचे आरेखन करून देण्यात यावा, असे पत्रात म्हंटले आहे.

Leave a Comment