व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मोहन भागवत दिल्लीच्या मशिदीत; इमाम म्हणतात, हे तर ‘राष्ट्र ऋषी’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीला भेट दिली. यावेळी त्यांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे उमर अहमद इलयासी यांची भेट घेतली. जवळपास १ तास दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीने चर्चाना उधाण आले.

या भेटीनंतर उमर इलियासी यांनी त्यांना ‘राष्ट्रपिता’ आणि ‘राष्ट्राचे ऋषी’ म्हटले आहे. मोहन भागवत यांचे आमच्या येथे ही भाग्याची गोष्ट असल्याचे उमेर इलियासी यांनी सांगितले. देशाची एकता, अखंडता टिकली पाहिजे, आपल्या उपासनेच्या पद्धती वेगळ्या असू शकतात. पण त्यापूर्वी आपण सर्व मानव आहोत आणि मानवता आपल्यामध्ये राहिली पाहिजे. भारत विश्वगुरू होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे आणि आपण सर्वांनी भारताला विश्वगुरू बनवण्याचा प्रयत्न करत राहायला हवे असेही त्यांनी म्हंटल.

दरम्यान, अलीकडच्या काळात आरएसएसने मुस्लिमांशी संपर्क वाढवला आहे. भागवत यांनी मुस्लिम समाजाच्या नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. गेल्या वर्षीही त्यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये मुस्लिम विचारवंतांच्या गटाची बैठक घेतली होती. तर सप्टेंबर 2019 मध्ये, भागवत यांनी दिल्लीतील RSS कार्यालयात जमियत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना सय्यद अर्शद मदनी यांचीही भेट घेतली.