ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या मृत्यूची अफवा पसरताच पत्नीने केले ट्विट; चाहत्यांना केले हे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना रविवारी सकाळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये अत्यंत काळजीचे वातावरण पसरले होते. मुख्य म्हणजे यादरम्यानच दिलीप कुमार यांचा मृत्यू झाला असल्याच्या अफवांना उधाण आले होते. यामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांमध्ये आणखीच चिंतेचे वातावरण निर्माण झाले. व्हॉट्सअॅपवर दिलीप कुमार यांच्या मृत्यूची बातमी इतक्या वेगाने पसरत होती कि काही वेळाने ती कित्येकांना खरोखरच खरी वाटू लागली होती. मात्र योग्यवेळी दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी चाहत्यांची चिंता दूर केली आणि सोबतच त्यांना आवाहनही केले.

https://twitter.com/TheDilipKumar/status/1401533990905868289

दरम्यान दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून त्यांची पत्नी सायरा बानो या त्यांच्या आरोग्यासंबंधित सर्व माहिती त्यांच्या चाहत्यांना देत असतात. आता देखील त्यांनी दिलीप कुमार यांच्या मृत्यूची अफवा पसरल्यानंतर लगेच ट्टीट करीत या बातम्यांचे खंडन केले आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘व्हॉट्सअॅपवरील फॉरवर्ड मॅसेजेवर विश्वास ठेवू नका. दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर आहे. तुम्ही प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद. डॉक्टरांच्या माहितीनुसार, ते दोन-तीन दिवसांत घरी परतील.’ या ट्वीटनंतर दिलीप कुमार यांचा चाहत्यांचा जीव भांड्यात पडला असे म्हणता येईल.

https://twitter.com/TheDilipKumar/status/1401417347592691715

सायरा बानो यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप कुमार यांना रुटीन चेकअपसाठी मुंबईतील नॉन कोविड पीडी हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास अधिक त्रास जाणवत होता. हिंदुजा रुग्णालयातील डॉ. नितिन गोखले यांची टीम सध्या त्यांची देखभाल करत आहे. दिलीप कुमार यांच्यासाठी प्रार्थना करा आणि तुम्ही सुरक्षित राहा, असे सायरा बानो यांनी या दरम्यान ट्वीट केले होते. ११ डिसेंबर १९२२ मध्ये दिलीप कुमार यांचा जन्म पाकिस्तानात झाला. त्यांचे मूळ नाव यूसुफ खान होते. त्यानंतर रुपेरी पडद्यावर त्यांना दिलीप कुमार नावाने ओळख देण्यात आली. दिलीप कुमार यांनी आपले नाव एका निर्मात्याच्या सांगण्यानुसार बदलले होते. ज्यामुले आजही बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आणि चाहत्यांमध्ये त्यांची ओळख दिलीप कुमार या नावानेच आहे.

Leave a Comment