बांधकाम मजुरांना राज्य सरकारचा दिलासा; २ हजार रुपयांची मदत जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या उद्रेकामुळं ३ मे पर्यंत देशभरात लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. अशात या लॉकडाउनचे सर्वाधिक चटके मजूर वर्गाला बसत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील १२ लाख बांधकाम मजुरांना प्रत्येकी २ हजारांची मदत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. सध्या राज्यात सगळ्या प्रकारची बांधकामं बंद आहेत. त्यामुळे या मजुरांवर बेकारीचं संकट ओढवलं असून त्यांना आर्थिक अडचण सहन करावी लागते आहे.

अशा परिस्थितीत या बांधकाम मजुरांना आर्थिक दिलासा देता यावा म्हणून त्यांना प्रत्येकी २ हजारांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे अशी माहिती राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. राज्यातील १२ लाख बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत.

बांधकाम मजुरांचा हक्काचा पैसा महाराष्ट्र राज्य बांधकाम मजूर मंडळात जमा आहे. जमा असलेली रक्कम ९ हजार कोटींच्या घरात आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून सेसच्या रुपाने ही रक्कम राज्य सरकारकडून घेतली जाते. त्यामुळे आता करोनासारखा संकट काळ समोर आलेला असताना बांधकाम मजुरांच्या खात्यात पैसे जमा केले जावे असा प्रस्ताव राज्याच्या कामगार विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला होता. त्यानुसार मदतीच्या स्वरुपात प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयास मंजुरी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment