रशियाकडून युक्रेनला चर्चेचा प्रस्ताव, पण युक्रेन राष्ट्राध्यक्षांनी ठेवली ‘ही’ अट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरूच असून अजूनही रशिया कडून युक्रेन वर गोळीबार आणि बॉम्ब हल्ले सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक युरोपिअन देशांनी रशिया वर काही निर्बंध लादले आहेत. या सर्व घडामोडींदरम्यान रशियाने युक्रेन समोर बेलारूस मध्ये चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे.

रशियाने बेलारुसमध्ये चर्चेसाठी प्रस्ताव दिल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी आपण तयार असल्याचं म्हटलं. मात्र बेलारूसमध्ये चर्चा करायला आपण तयार नाही असे त्यांनी सांगितले. कारण बेलारूसचा हल्ल्यासाठी लाँचपॅड म्हणून वापर केल्याचा आरोप त्यांनी केलाय. चर्चा करायचीच असेल तर बेलारूस ऐवजी इंग्लंड, हंगेरी, ब्रातिस्लावा, बुडापेस्ट, इन्स्ताबुल किंवा बाकु यापैकी कोणत्याही ठिकाणी चर्चा करण्यासाठी तयार आहे असं झेलेन्स्की यांनी सांगितले.

दरम्यान, युक्रेन मध्ये भीतीदायक परिस्थिती असून युक्रेनच्या मदतीला अद्याप कोणीही आलेले नाही. नाटो सदस्य असलेल्या देशांनीही हात वर केल्याने युक्रेन एकाकी पडला आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ येताच अमेरिका राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाला इशारा दिला आहे. आता तिसर महायुद्ध हाच अंतिम उपाय आहे असं त्यांनी म्हंटल.

Leave a Comment