रशियामध्ये गेल्या 24 तासांत विक्रमी मृत्यू, पुतीनकडून देशात एक आठवड्याचा ‘Paid Holiday’ जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मॉस्को । रशियामध्ये व्हायरस संसर्ग आणि मृत्यूच्या वाढत्या घटनांमध्ये, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कामगारांसाठी एक आठवड्याच्या पेड सुट्टीचे (Week-Long Paid Holiday) आदेश दिले आहेत. या रजेदरम्यान त्यांना पूर्ण वेतन दिले जाईल. ही सुट्टी 30 ऑक्टोबरपासून सुरू होईल. या सुट्ट्यांमध्ये लोकांना स्वतः लसीकरण करण्याचे आवाहनही सरकारने केले आहे.

अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत पुतीन म्हणाले की,” त्यांनी 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान देशभरात पेड हॉलिडे जाहीर करण्याच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला आहे.”

दरम्यान, रशियामध्ये गेल्या 24 तासांत विक्रमी 1,028 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत संक्रमणामुळे एकूण 2,26,353 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा आतापर्यंत युरोपमध्ये सर्वाधिक आहे. उपपंतप्रधान तात्याना गोलिकोवा यांनी 30 ऑक्टोबरपासून एक आठवड्याची सुट्टी जाहीर करण्याचे सुचवले, ज्याला पुतीन यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे.

Leave a Comment