रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला बसणार सर्वाधिक फटका; कसा ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रशिया-युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. विदेशी ब्रोकरेज फर्म नोमुराने म्हटले आहे की,”या वादाचा आशिया खंडातील भारतावर सर्वाधिक परिणाम होईल.” या युद्धामुळे जगभरात महागाई वाढणार असल्याचे ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे. कोरोना विषाणूपासून सावरत जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हे अत्यंत धोकादायक आहे.

नोमुराने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारत आशियातील अशा देशांमध्ये आहे, ज्यांना या संकटाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. गुरुवारी युक्रेनवर झालेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे गेली आहे. या रिपोर्टचे लेखक अरोदीप नंदी आणि सोनल वर्मा यांनी म्हटले आहे की, “तेल आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींचा आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल.”

‘या’ देशांवर जास्त परिणाम
आशियातील भारत, थायलंड आणि फिलीपिन्सवर याचा सर्वाधिक परिणाम होईल, असे नोमुराने म्हटले आहे. याचा थोडाफार फायदा इंडोनेशियाला होऊ शकतो. या संकटामुळे भारतात महागाई वाढू शकते आणि चालू खात्यातील तूट वाढू शकते. कच्च्या तेलाच्या उच्च किंमतींचा भारताच्या आर्थिक स्थितीवर खोल परिणाम होईल. कारण भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात करतो. एका अंदाजानुसार, तेलाच्या किंमतीत 10% वाढ झाल्यास GDP मध्ये 0.2% ची घसरण होऊ शकते.

चलन दर वाढू शकतो
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मॉनेटरी पॉलिसी अकोमोडेटिव्ह ठेवण्याचे संकेत दिले आहेत. मात्र अशीही शक्यता आहे की, जर महागाई वाढली तर RBI ही आपली पॉलिसी आणखी कठोर बनवू शकते. या महिन्याच्या सुरुवातीला चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत पुढील आर्थिक वर्षात सरासरी महागाई दर 4.5 टक्के राहण्याची अपेक्षा होती.

त्याच वेळी, QuantEco रिसर्च नुसार, भारताच्या कच्च्या तेलाच्या बास्केटमध्ये प्रति बॅरल $10 च्या वाढीमुळे जीडीपी वाढ 0.10 टक्क्यांनी कमी होऊ शकते. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 9.2 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्थायी 10 टक्के वाढीमुळे डब्लूपीआई इनफ्लेशनमध्ये 1.2 टक्के आणि CPI इनफ्लेशनमध्ये 0.3 ते 0.4 टक्के वाढ होऊ शकते.

Leave a Comment