सातारा । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून शनिवार वाडा हटवण्यात यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. क्रांन्तिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८८ व्या जयंती निमित्त खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्मोत्सव साजरा करणयात आला. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या नावपुढे बोधचिन्ह म्हणून शनिवारवाडा असेल तर त्याला आम्ही आमच्या गुलामीचे प्रतीक समजतो अशी टीका करत सचिन माळी आणि शीतल साठे यांनी शनिवारवाडा हटवण्याची मागणी केली.
शिवाजी विद्यापीठाच्या बोधचिन्हाच्या मुद्रत जसे शिवाजी महाराज आहेत तसे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या बोधचिन्हात सावित्रीबाई फुले असल्या पाहिजेत. शनिवार वाडा हा पेशवाईवे प्रतिक आहे. ज्या पुण्यात तेव्हाच्या ब्राह्मनी पेशवाईने सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांना वाळीत टाकले होते त्या पेशवाईचे प्रतिक असलेला शनिवार वाडा सावित्रीबाईंच्या नावात नसायला हवा अशी भुमिका घेत सत्यशोधक ओबीसी संघटना, सम्यक विध्यार्थी आंदोलन, मुक्तीवादी संघटना, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, सत्यशोधक विद्यार्थी संघटना आदी संघटनांनी शनिवार वाडा हटवण्याची मागणी केली.
दरम्यान माळी यांच्या महाजलसा कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्याचा त्यांनी निषेध केला. आमचे मुलभूत हक्क डावलले गेले असून आम्हाला नजरकैदेत ठेवण्यात आले. मुख्यमंत्री वेळेवर न आल्यामुळे 10 वाजल्यापासून 1:30 पर्यन्त आत जाण्याची कोणालाच परवानगी दिली नाही. सावित्रीबाई च्या लेकींना बाहेर ठेवण्यात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य डावलले गेलं. याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. असे माळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.
[youtube https://www.youtube.com/watch?v=SsreVbJEYs8&w=560&h=315]