…अन्यथा ग्रामस्थांसह करणार रेल रोको : सचिन नलवडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील पार्ले येथील ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनास पार्ले येथील गेट नंबर 98 च्या भूयारी पुलाचे काम सुरु करण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केल्याने पार्ले, वडोली निलेश्वर, कोपर्डे हवेली ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. दरम्यान गुरुवारी कराड रेल्वे स्टेशन येथे रेल रोको करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला असून याबाबतचे निवेदन रयत क्रांतीचे सचिन नलवड़े यांनी रेल प्रबंधक पुणे यांना ईमेल द्वारे दिली.

नलवडे यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली चार महिने रेल्वे प्रशासनाच्या ढीसाळ कारभारचा फटका पार्ले, वडोली निलेश्वर,कोपर्डे हवेली येथील नागरिकांना बसत आहे. वडोली निलेश्वर व उत्तर पार्ले येथे जाण्यासाठी रेल्वे क्रॉसिंग करणे एवढा एकच मार्ग आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या महिला, शाळा महाविद्यालय या याठिकाणी जाणारे विध्यार्थी यांना ३ ते ४ किलोमीटर पायपिट करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी ये जा करताना हा रस्ता निर्मानुष्य असल्याने महिला वर्ग भीतिच्या छायेखाली आहे.

गत आठवडाभरात झालेल्या वादळी पाऊसाने रेल्वे शेजारील पानंद रस्ता चिखलमय झाल्याने बंद झाला होता. त्यावेळी नागरिकांना सह्याद्री कारखाना, शहापूर, वडोली मार्गे ८ ते १० किमीवरुन उत्तर पार्ले येथे प्रवास करावा लागत होता. पावसाळ्या पूर्वी बोगद्याचे काम पूर्ण झाले नाहीतर येथील नागरिकांचे आतोनात हाल होणार आहेत. रेल्वे प्रशासनाने जर २० तारखेपूर्वी काम सुरु केले नाहीतर तिन्ही गावचे नागरिक आक्रमक पवित्रा घेणार आहेत. तसेच त्याच्याकडून रेल रोकोहि केला जाणार आहार. त्यामुळे ग्रामस्थांच्या भावनेचा उद्रेक होण्याची वाट रेल्वे प्रशासनाने पाहू नये, असा इशारा निवेदनाद्वारे नलवडे यांनी दिला आहे.

Leave a Comment