Tuesday, June 6, 2023

आमच्या सभ्यतेला आमची कमजोरी समजू नका – सचिन तेंडुलकरचा पाकिस्तानवर हल्लाबोल

मुंबई | भारतीय वायुसेनेने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यावर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आमच्या सभ्यतेला आमची कमतरता समजू नका असे म्हणत सचिनने पाकिस्तानला सुनावले आहे.

तसेच सचिन तेंडुलकर ने भारतीय वायुसेनेच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. आय सेल्युट द IAF असे ट्विट करुन सचिनने भारतीय वायुसेनेला सलाम केला आहे.