मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर रुग्णालयात उपचार; ट्विट करून स्वतः दिली माहिती

मुंबई । क्रिकेटर सचिन तेंडुलकरला काही दिवसांपूर्वी कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी करोनाची लक्षणे ही सौम्य असल्यामुळे सचिन तेंडुलकर घरीच उपचार घेत होता. पण शुक्रवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून वैद्यकीय सल्ल्यानुसार आता आपण हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असल्याचं त्याने सांगितलं आहे.

त्याने आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की ‘ तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आभार. वैद्यकीय सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. आशा आहे की, काही दिवसातच परत येईन. तसेच काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. असा सल्ला देखील त्याने देशवासियांना आपल्या ट्वीट च्या माध्यमातून दिला आहे.

टीम इंडियाला शुभेच्छा

भारतीय संघाच्या वर्ल्डकप विषयाला आज दहा वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने देखील आपल्या ट्वीट मधून शुभेच्छा दिल्या आहेत. ‘संपूर्ण भारतवासीयांना आणि माझ्या भारतीय संघातील सहकाऱ्यांना वर्ल्डकप विजयाला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा…’ असा संदेश त्याने आपल्या ट्विट मधून दिला आहे.

सचिनच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील कोरोना चाचणी केली असून त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत असे त्याने सांगितले आहे. दरम्यान नुकताच सचिन तेंडुलकरने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज मध्ये भाग घेतला होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजेतेपदही पटकावलं. त्यानंतर सचिन सोबतच एस बद्रीनाथ, इरफान पठाण, युसुफ पठाण यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

You might also like