Sunday, May 28, 2023

टेनिस खेळताना दिसून आला सचिन तेंडुलकर; रॉजर फेडररकडून मागितला ‘हा’ सल्ला; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरला टेनिस खेळायलाही आवडते. अलीकडेच तो टेनिस कोर्टवर दिसला आणि यावेळी तो खेळाचा मनसोक्त आनंद घेत होता. सचिनने आपल्या चाहत्यांसमवेत टेनिस खेळण्याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे तसेच त्याने दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररकडून सल्लाही मागितला आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टेनिस खेळण्याचा व्हिडिओ शेअर करताना सचिनने रॉजर फेडररला टॅग केले आणि लिहिले,” फॉरहँडसाठी माझ्यासाठी काही सल्ला आहे का? हा व्हिडिओ 24 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि हजारो लोकांनी या व्हिडिओवर कमेंट्सही केलेल्या आहेत. याक्षणी रॉजर फेडररने यावर आपली प्रतिक्रियाही व्यक्त केलेली नाही.


View this post on Instagram

 

Hey @rogerfederer! Any tips for my forehand? 😋🎾 @wimbledon #FlashbackFriday #wimbledon

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on Jul 3, 2020 at 7:10am PDT

 

क्रिकेटमध्ये अनेक विक्रम नोंदवणाऱ्या सचिनला टेनिसची आवड आहे आणि त्याने अनेकदा फेडररची स्तुती केलेली आहे. सचिनने एकदा त्याच्याबद्दल सांगितले होते की, तो गेल्या 10 वर्षांपासून फेडररला खेळताना पहात आहे. तो एक अतिशय सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहे. या लॉकडाऊनमुळे सध्या बहुतेक क्रीडा कर्यक्रम ठप्प आहेत. अशा परिस्थितीत सर्व खेळाडू हे स्वत: ला व्यस्त आणि तंदुरुस्त ठेवण्याचे प्रयत्न करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.