दुःखदायक ! तेलंगणात एकाचवेळी ५० मृतदेहांवर करण्यात आले अंत्यसंस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यातच भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशभर एकूण १२ लाख रुग्ण आहेत. तर ७ लाख रुग्ण बरे झाले आहेत. तर मृत्यूचा आकडा पण जास्त आहे. कोरोनाच्या भीतीने लोक एकमेकांना मदत करण्यास तयार होत नाहीत कि घरातले नातेवाईक रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यास तयार होत नाही . माणसातली माणुसकी कमी झाली . अश्यातच एक घटना समोर आली आहे. एकाच वेळी ५० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ तेलंगणा सरकार वर आली आहे.

सोशल मीडियावर या घटनेचा धक्कादायक पण वास्तव असा व्हिडीओ समोर आला आहे. कोरोनाच्या काळात मृतांचा आकडा हा वाढल्याने अंत्यसंसकार करण्यास जागा नसल्याचे चिन्ह पाहायला मिळाले आहे. त्यामुळे तब्बल ५० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ तेलंगणा सरकार वर आली आहे. त्यानुसार तेलंगणच्या ESI रुग्णालयाच्या परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

 

तेलंगणाचे वैद्यकीय शिक्षण संचालक अधिकारी डॉ. के रमेश रेड्डी यांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिल आहे की, वाहतूक आणि मनुष्य बळाचा अभाव या गोष्टीमुळे एकाच ठिकाणी एकाच वेळी ५० हुन अधिक मृत्यूदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले. ५० हुन अधिक मृत्यूदेह वाहून नेण्यासाठी वाहने आणि पालिका अधिकारी अपुरे असल्याचे सांगत या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा वृत्ताला दुजोरा दिला. त्यानंतर ते हेही म्हणाले की, एकाच दिवशी इतक्या लोकांचा मृत्यू झाला नव्हता. गेल्या तीन दिवसांपासून हे मृतदेह रुग्णालयात पडून होते वाहतुकीची अभावामुळे एकाच वेळी सर्व मृत्यूदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment