व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आमचा जन्म राजकारणासाठी झालेला नाही; अर्ज मागे घेताच सदाभाऊंची पहिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणूकीनंतर आता विधान परिषदेतही जोरदार लढती होणार आहेत. कारण हि निवडणुकी बिनविरोध झालेली नाही. मात्र, या निवडणुकीत ज्याच्या उमेदवारीवरून जास्त चर्चा होती त्या सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज काढून घेतला. त्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. भाजपने जेवढा सन्मान करायचा तेवढा केला आहे. मी समाधानी आहे. आम्ही मातीसाठी लढणारे लोक आहोत. आमचा जन्म राजकारणासाठी झाला नाही, असे खोत यांनी म्हंटले.

यमेद्वारी अर्ज मागे गेतल्यानांतर सदाभाऊ खोत यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी एक सर्वसामान्य कुटूंबातील, एका गावातून आलेलो. राजकारणात येण्यासारखी माझी काही पार्श्वभूमी देखील नाही. माझा प्रवास एका लहानशा गावातून सुरू झाला. ग्रामीण भागात काम करत असताना कष्टकरी वर्गाचे प्रश्न, त्यांच्यासाठी मी लढलो. मला आतापर्यंत भरपूर काही मिळाले आहे. येथून पुढच्या काळात जो लढा घेऊन निघालोय, तो सुरूच राहील.

आतापर्यंत भाजपने महादेव जानकर, मी तसेच विनायक मेटे यांना आमदार केले. आम्हाला मंत्रिपदेही दिली. आमचा जेवढा सन्मान करायचा तेवढा भाजपने केला आहे. मी समाधानी आहे. भाजपमध्ये ज्या ठिकाणी धोरणं ठरवेळी जातात. त्या व्यासपीठावर येण्याची संधी मला मिळाली, असेही खोत यांनी यावेळी सांगितले.