Sunday, June 4, 2023

बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? हे मी मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार; सदाभाऊंचा शरद पवारांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्याकडून अनेकवेळा राष्ट्रवादी काँग्रेस व पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली जाते. नुकत्याच पार पडलेल्या ब्राह्मण संघटनांच्या बैठकीत दुसऱ्याच्या आरक्षणाला तुम्ही विरोध करु नका, असे म्हटले होते. यावरून आज सदाभाऊ खोत यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. “मी मेल्यावर बारामतीचा हा गडी कसा आला हे ब्रम्हदेवाला विचारणार आहे. हा गडी एवढा हुशार झालाच कसा? यांच्यामध्ये कोणते स्पेअरपार्ट घातले हेही ब्रह्मदेवाला विचारणार आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

आटपाडी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात सदाभाऊ खोत यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. ते ,म्हणाले की, मला वाटतं ब्रह्मदेवाला चुकवून शरद पवार हे खाली पळाले असणार. एवढा बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणारा नाही. या महाराष्ट्राला लुटण्याचे काम या मंडळींनी केले आहे. म्हणून मी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती करतो की आपल्याला हे सरकार घालवायचे आहे,” असे सदाभाऊ खोत म्हणाले.

एकमुखाने मागणी करुया की हर्बल तंबाखूचे बियाणे द्या

यावेळी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, यावर्षी हर्बल गांजा पेरायला हवा होता. कारण हर्बल गांजाला परवानगी देण्यात आली आहे. नवाब मलिकांच्या जावयाकडे गांजा सापडल्यानंतर तो हर्बल तंबाखू असल्याचे सांगितले. त्यामुळे आपण एकमुखाने मागणी करुया की हर्बल तंबाखूचे बियाणे द्या त्यामुळे आमची गरिबी तरी जाईल. कारण तुम्ही आम्हाला काही देऊ शकत नाही. जो कोणी बोलतो त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन जेलमध्ये टाकले जाते, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.