Krushna Election Result : महिला राखीव गटातूनही सहकार पॅनेलचा दणदणीत विजय; इंदुमती जाखले 10658 तर जयश्री पाटील 10940 मतांनी विजयी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड । यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनेलच्या महिला राखीव गटात दोन जागांवर पहिल्या फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. सहकार पॅनेलच्या नेर्ले येथील इंदुमती दिनकर जाखले यांनी 5 हजार 280 तर बहे येथील जयश्री माणिकराव पाटील यांनी 5 हजार 238 मतांची आघाडी घेतली होती. नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार महिला राखीव गटातून सहकार पॅनेलच्या इंदुमती जाखले 10 हजार 658 तर जयश्री पाटील 10 हजार 940 मतांनी विजयी झाले आहेत.

Krushna Election Result : सभासदांनी राजकारण्यांना बाजूला काढले - Dr Suresh Bhosle

कृष्णा कारखान्याच्या मतमोजणीत महिला राखीव गटाचा दोन्ही फेरीतील निकाल जाहीर करण्यात आला आहे. दोन्ही फेरीतील मिळालेली मते पुढीलप्रमाणे सहकार पॅनेल इंदुमती दिनकर जाखले (नेर्ले) 19 हजार 594 तर जयश्री माणिकराव पाटील 19 हजार 876, संस्थापक पॅनेल मीनाक्षीदेवी संभाजी दमामे (बहे) 8 हजार 916 तर उमा अजित देसाई (काले) 8 हजार 936, रयत पॅनेल उषा संपतराव पाटील (शेरे) 4 हजार 253, सत्वशीला उदयसिंह थोरात (बहे) 4 हजार 694 अशी मते मिळाली आहेत.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/4142142279203620

Leave a Comment