‘बचपन का प्यार’ वाले गाणे गायलेला सहदेव एका रात्रीत बनला इंटरनेट स्टार, ‘या’ व्यक्तीमुळे बदलले नशीब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दूरच्या आदिवासी भागातील एक मूल अचानक देशभरात लोकप्रिय झाले, हा सोशल मीडियाचा चमत्कार आहे. छत्तीसगडमधील 12 वर्षांच्या मुलाचे स्वप्न साकार झाले, त्याचे नाव आहे सहदेव कुमार दिरदो. या मुलाने स्वप्नातही विचार केला नसेल की, एखादे गाणे अशा प्रकारे त्याचे आयुष्यच बदलेल. सहदेव ‘बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना’ गाऊन इतका फेमस झालं की, प्रसिद्ध रॅपर गायक बादशाहने त्याला वचन दिले. आपले वचन पाळत, आता बादशहाने ‘बचपन का प्यार’ नावाचा एक म्युझिक अल्बम जारी केला आहे जो रिलीज होताच यूट्यूबवर ट्रेंडिंगला आला आहे.

या म्युझिक व्हिडीओमध्ये सहदेव रॉक स्टारसारखा दिसून येतो आहे. मात्र सहदेवला या टप्प्यावर नेणारी व्यक्ती कोण आहे, त्याबद्दल जाणून घेउयात. छत्तीसगडचे सुकमा हे असेच एक क्षेत्र आहे जिथून नक्षलवाद्यांच्या दहशतीच्या बातम्या सतत येत राहतात. या भागात एक गाव आहे, उर्मापाल, जिथे सहदेव कुमार दिरडो नावाचा मुलगा मजेने ‘बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे’ गात असे. त्याला माहितही नव्हते की, सोशल मीडियाच्या काळात लोकांना त्याची ही कृती लोकांना इतकी आवडेल की, तो एक स्टार बनेल.

सहदेव आता सातवीत शिकत आहे, मात्र दोन वर्षांपूर्वी, जेव्हा तो पाचवीत होता, 26 जानेवारी रोजी, त्याच्या शिक्षकांनी त्याला एक गाणे म्हणायला सांगितले. सहदेवने आपल्या निरागसतेत ‘बचपन का प्यार …’ गायले. शाळेच्या शिक्षकाला हे गाणे इतके आवडले की, त्याने ते मोबाईलवर रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर सहदेवचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला.

सहदेवचा व्हिडीओ ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला आणि शेअर केला गेला. सहदेव खूपच लोकप्रिय झाला. मात्र त्याला याची जाणीव पण नव्हती. जेव्हा सहदेवचे गाणे व्हायरल होऊ लागले, तेव्हा छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्वतः फोन त्याला बोलावले त्याचे गाणे ऐकले आणि त्याचे कौतुक केले. तसेच फोटो काढून ते सोशल मीडियावर शेअर केले.

सहदेवने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सुकमाचे यूट्यूबर पिंटू साहू आणि जॉनी फँटम यांनी त्याला सांगितले की, माझे गाणे खूप हिट झाले आहे आणि बॉलिवूड सिंगर बादशाहला त्याच्याशी बोलायचे आहे. व्हिडिओ कॉल केल्यानंतर, बादशहा सहदेवशी बोलला आणि विचारले की तू माझ्याबरोबर गाणे गाशील का ?, त्यावर सहदेव हो म्हणाला.

सहदेव आपल्या वडिलांसह छत्तीसगडमधील सुकमा येथून पंजाबमधील चंदीगडला पोहोचला. बादशहाने वचन पूर्ण करत सहदेवसोबत गाणे रेकॉर्ड केले आणि आता त्याचा म्युझिक अल्बम सर्वांसमोर आहे. सहदेवची ख्याती म्हणजे अलीकडेच त्याला इंडियन आयडॉल 12 च्या मंचावरही बोलावण्यात आले. सहदेवला ही कीर्ती अचानक मिळाली आहे मात्र आता मोठे होत त्याला गायक व्हायचे आहे. आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या सहदेवला आई नाही आणि वडील शेती करतात.

Leave a Comment