परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
संत जनाबाई यांच्या पालखीने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले. परभणी जिल्ह्यातील अनेक वारकरी या पालखीत सहभागी झाले असून टाळ आणि मृदंगाचा गजर करत वारकरी विठ्ठलाच्या भेटीला पंढंरपूरकडे चालले आहेत.
परंपरेप्रमाणे संत जनाबाई यांचे जन्मस्थान असलेल्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथून, संत जनाबाई यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. शहरातील गोदावरी काठावर, संत जनाबाई यांचे जन्मस्थान आहे. याच ठिकाणावरून मागील 48 वर्षांपासून ही पालखी पंढरपूरला जाते. ज्यामध्ये घोडे , बैलगाडी आणि वारकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. मागील चार ते पाच वर्षांपासून मराठवाडा दुष्काळात होरपळतोय.
किमान यावर्षी तरी चांगला पाऊस होऊन दुष्काळ मिटावा या प्रार्थनेसह हजारो वारकऱ्यांनी पंढरपूर कडे प्रस्थान केले. पालखीमध्ये गंगाखेड तालुक्यासह जिल्ह्यातील, भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, पुढील अकरा दिवस प्रवास करत ही पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या –
पावसाच्या सरी अंगावर घेत तुकोबाची पालखी ‘लोणी काळभोर’ मुक्कामी
आयुष्यात एकदा तरी पंढरी वारी करावी, नरेंद्र मोदींचे मन की बात मधून आवाहन
तुकोबांची पालखी सराटीहुन तर माऊलींची पालखी नातेपुत्याहून मार्गस्थ
ज्ञानोबांची पालखी जेजुरीत दाखल.माऊलीच्या पालखी पालखीवर भंडाऱ्याची मुक्त उधळण
आषाढी वारीचा सोहळा आज पासून सुरु, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूवरुन प्रस्थान