आम्ही जिंकू शकलो नाही! साक्षी मलिक आणि विनेश फोगटचा कुस्तीला ‘रामराम’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्यंतरी कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट या दोघींनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणावरून देशात नवीन वाद निर्माण झाला होता. आता या सर्व प्रकरणानंतर साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. या दोघींनी देखील आपण इथून पुढे कुस्ती खेळणार नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली की, “आम्ही जिंकू शकलो नाही. परंतु पूर्ण भावनेने आम्ही लढाई लढलो. पण महासंघाच्या अध्यक्षपदी बृजभूषण सारख्या व्यक्ती, त्यांचा सहकारी जिंकून येत असेल, तर मी माझ्या कुस्तीचा त्याग करते, यापुढे मी कुस्तीच्या मैदानात दिसणार नाही. देशवासियांना धन्यवाद”

त्याचबरोबर, विनेश फोगट म्हणाली की, “आम्ही सर्व प्रकारे प्रयत्न करून शेवटी दिल्लीच्या रस्त्यावर उतरलो. मुलींना वाचवण्यासाठी आम्ही नावे देखील स्पष्टपणे सांगितली. परंतु त्यानंतर देखील काहीही झाले नाही. आता संजय सिंह यांना आज अध्यक्ष करण्यात आले. त्यांना अध्यक्ष केले म्हणजे खेळातील मुलींना पुन्हा बळी पडावे लागेल. देशात आम्हाला न्याय कसा मिळेल हे माहीत नाही. आज कुस्तीचे भवितव्य अंधकारमय आहे, हे अतिशय दुःखद आहे”

दरम्यान, कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक खेळाचे आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळातील वातावरण तापले होते. या दोघींनी देखील ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे मागणी केली होती. परंतु तरीदेखील त्यांच्या विरोधात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर आज
संजय सिंह यांना अध्यक्ष केल्यानंतर या दोघींनी देखील कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे.