सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
साताऱ्यातील नीरा नदी पात्रातील दूषित पाण्यामुळे लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना समोर येत आहे. सोमेश्वर साखर कारखान्याच्या दूषित मळीयुक्त पाण्यामुळे या माशांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच या मृत माशांपैकी तब्बल 10 टन माशांची विक्री करण्यात आल्याची चर्चा सुरु असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण तालुक्यातील होळ येथे ढगाई माता मंदिराच्या पाठीमागील बंधाऱ्याजवळ आलेल्या सोमेश्वर साखर कारखान्याच्या दूषित मळीयुक्त पाण्यामुळे मागील तीन दिवसांपासून निरा नदी पात्रातील लाखो मासे मृत्युमुखी पडले आहे. तसेच संपूर्ण नदीच्या पाण्याला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
Satara News : दूषित पाण्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या माशांची विक्री? नागरिकांचं आरोग्य धोक्यात#Hellomaharashtra #satara pic.twitter.com/k7iLVGtY0T
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 3, 2023
नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झाल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. त्यातच धक्कादायक म्हणजे मृत झालेल्या एकूण माशांमधील १० टन माशांची विक्री झाल्याची चर्चा सुरु आहे. या मृत माशांच्या विक्रीमुळे नागरिकांच आरोग्य धोक्यात आलं असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.