सलमान खानला चावला साप; पनवेलच्या फार्महाऊसमधली घटना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूड चा भाईजान सलमान खान याला साप चावल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री पनवेलच्या फार्महाऊसमध्ये सलमानच्या पायाला साप चावल्यानंतर त्याला तात्काळ रात्री 3 वाजता एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यानंतर आज सकाळी 9 वाजता सलमानला डॉक्टरांनी घरी सोडलं असून आता त्याची प्रकृती व्यवस्थित आहे.

25 डिसेंबरचा नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशन साठी सलमान काही जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत पनवेल इथल्या फॉर्महाऊसवर आला होता. शनिवारी रात्री फॉर्महाऊस परिसरात सलमानच्या पायाला सापानं दंश केला.सुदैवाने साप बिनविषारी होता, त्यामुळे मोठं संकट टळलं.

दरम्यान, 27 डिसेंबरला सलमान खान चा वाढदिवस असून सलमान आता 56 वर्षांचा होणार आहे. कोरोनामुळे सलमान आपला वाढदिवस साधेपणाने करणार असल्याचे समजत असून यावेळी सलमानच्या वाढदिवसानिमित्त एक छोटीशी पार्टी होणार आहे.

You might also like