‘मुलानां जीव लाव’ असा फोन करत, सलून चालकाने केली आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद | देशभरात वेळोवेळी लागले लॉकडाउन मुळे छोटे व्यावसायिक हातमजूर यांची आर्थिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे असे छोटे व्यवसायिकांनी हातमजूर हतबल होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. औरंगाबादमध्ये भुईवाड्यातील एका सलून चालकाने कर्जाबाजरीपणामुळे आत्महत्या केल्याची घटना काल रात्री 8.30 वाजता समोर आली.

‘मुलाला जीव लाव’ असे पत्नीला सांगत या सलून चालकाने बुधवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास भुईवाडा येतील दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केली. विकास उत्तम ठाकरे असे आत्महत्या केलेल्या सलून चालकाचे नाव आहे.

कर्जबाजारीपणामुळे आणि व्यवसायठप्प असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती निकटवर्तीयांकडून मिळाली आहे. कैलासनगर येथील विलास यांचे भोईवाडा येथे सलून दुकान होते. लॉकडाउन मुळे त्यांचे दुकान गतवर्षी बंद होते. यामुळे ते कर्जबाजारी झाले. या वर्षी पुन्हा लॉकडाऊन लागल्यामुळे त्यांचे दुकान बंद पडले. त्यामुळे ते निराश होते.

बुधवारी ते दुकानात गेले. गळफास घेण्याच्या पंधरा-वीस मिनिटांपूर्वी त्यांनी पत्नीला फोन करून. ‘मुलाला जीव लाव’ असे सांगून फोन बंद केला. विलास यांच्या शब्द एकूण त्यांची पत्नी घाबरल्या त्या तातडीने भुईवाड्याकडे निघाल्या मात्र तोपर्यंत विलास यांनी आपली जीवनयात्रा संपवली होती. या विषयी क्रांती चौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment