तर संभाजी भिडेंच्या विरोधात अटक वाॅरंट

नाशिक | आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात अटक वाॅरंट निघणार आहे.

‘विशिष्ट आंबा खाल्ला की माणसाची पौरूष शक्ती वाढते आणि त्यामुळे पुत्रप्राप्ती होते’ या विधानावर भिडे यांची पुनर्विचार याचिका कोर्टाने फेटाळली. काही दिवसांपूर्वी ‘आंबे खाल्यानं मुलं होतात’ असं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं होतं. त्याविरोधात नाशिक पालिकेने कोर्टात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, भिडे न्यायालयाच्या सलग ३ तारखांना गैरहजर होते. त्यामुळे पुढील तारखेला हजर राहण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. जर भिडे पुढील तारखेस हजर राहिले नाहीत तर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढणार येणार असल्याचं बोललं जात आहे.

You might also like