Tuesday, June 6, 2023

देवेंद्रजी तुम्ही… भविष्यात पंतप्रधानही व्हाल पण…; संभाजीराजे छत्रपतींचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनेकवेळा मी पुन्हा येईन, असे सांगत मुख्यमंत्री होण्याबाबत वक्तव्ये केली गेली आहेत. दरम्यान त्यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या स्वप्नाबद्दल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महत्वाचे विधान केले आहे. ‘देवेंद्रजी तुम्ही आता विरोधी पक्षनेते आहात, उद्या मुख्यमंत्री व्हाल आणि भविष्यात पंतप्रधानही व्हाल. पण माझी एक अपेक्षा आहे की शिवाजी महाराजांचे आचारविचार हे लिखित स्वरुपात सामान्यातल्या सामान्य शिवभक्तापर्यंत पोहोचले पाहिजेत,’ असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

नुकताच चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचा अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले कि, आज महाराष्ट्र्रात अनेक प्रश्न आहेत. खासकरून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वपक्षीय राजकारण्यांनी एकत्र झाले पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज याचे ज काही विचार आहेत. त्यांच्या विचारांमुळेच महाराष्ट्राची ओळख दिल्लीत व इतिहासात वेगळी आहे. पण सध्या महाराजांच्या राज्यात मराठा, ओबीसी व इतर आरक्षणासाठी आपण आपआपसात भांडत आहोत. राजकारण-राजकारणाच्या ठिकाणी, पण आता महाराष्ट्राची ओळख जपण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे,” असेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हंटले.