भाजप ऐकत नसेल तर संभाजीराजेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा – हर्षवर्धन जाधव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समाज आक्रमक झाला असून संभाजी राजे सातत्याने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत. पण जर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही भेटायला तयार नसतील तर संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले.

ते गुरुवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. छत्रपती संभाजी राजेंनी भाजपच्या मदतीने संसदेत प्रस्ताव आणून मराठा आरक्षणाचा कायदा करावा. जर भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी हे संभाजीराजे यांचे ऐकत नसतील, भेटत नसतील तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले.

जाधव म्हणाले, की जम्मू-काश्मीरबाबतचे ३७० कलम रद्द केले, ईशान्याकडील वेगवेगळ्या राज्यांना विशेष दर्जा दिला. अशा बऱ्याच गोष्टी राज्य सरकारच्या अखात्यरित असताना त्यावर कायदे केंद्र सरकारने केले. तसेच मराठा आरक्षणाबाबतही केंद्र सरकार कायदा करु शकते. संभाजीराजे यांनी संसदेत सत्ताधारी भाजपकडून आरक्षणाचा प्रस्ताव मांडावा, असे श्री.जाधव यांनी सुचवले. जर मी पुन्हा निवडून आलो असतो तर मराठा आरक्षणासाठी पुन्हा राजीनामा दिला असता, असे ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment