Samruddhi Mahamarg Toll Rates : समृद्धी महामार्गावर टोल किती आहे माहितेय का? प्रवासाआधी आकडा बघाच

Samruddhi Mahamarg Toll Rates
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Samruddhi Mahamarg Toll Rates । अमणे ते इगतपुरी या शेवटच्या टप्प्याच्या उदघातानंतर मुंबई ते नागपूर हा ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या संपूर्ण सेवेत आला आहे. समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर एकमेकांना जोडले गेले आहेत. गुळगुळीत रस्ता असल्याने प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा आनंदही घेता येतोय आणि महत्वाचं म्हणजे वेळही वाचतोय… मुंबईपासून नाशिक, मराठवाडा आणि विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने समृद्धी महामार्ग हा वरदान ठरला आहे. परंतु समृद्धी महामार्गावरून जाताना तुम्हाला टोल किती द्यावा लागतोय हे माहितेय का? चला तर मग आज जाणून घेऊयात…

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून या महामार्गावर प्रवास करताना किती टोल (Samruddhi Mahamarg Toll Rates) द्यावा लागणार याची यादी जाहीर करण्यात आली आहे. 2032 पर्यंत टोलचे हे दर असणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विकासाकडून जारी करण्यात आलेले टोल दर हे २ टप्प्यात असणार आहेत. सध्या एप्रिल 1 2025 पासून एका टप्प्यातील दर आकारण्यात येत आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील दर एप्रिल 1 2028 पासून आकारण्यात येईल. अंतिम भाडेवाढ एप्रिल 2031 पासून ते 10 डिसेंबर 2032 पर्यंत वैध असेल. प्रत्येक टप्प्यात २०% टोल दर वाढवण्यात येतील.

कोणत्या गाडीला किती रूपये टोल कट होतोय? Samruddhi Mahamarg Toll Rates

हलकी वाहने: 2.45 रुपये (2.06 रुपयांवरून वाढ)
हलकी व्यावसायिक वाहने: 3.96 रुपये (3.32 रुपयांवरून वाढ)
दोन-अ‍ॅक्सल जड वाहने: 8.30 रुपये (6.97 रुपयांवरून वाढ)
तीन-अ‍ॅक्सल जड वाहने: 9.05 रुपये (7.60 रुपयांवरून वाढ)
अवजड बांधकाम यंत्रसामग्री: 13.02 रुपये (10.93 रुपयांवरून वाढ)
मोठ्या आकाराची वाहने (7+ एक्सल): 15.84 रुपये (13.30 रुपयांवरून वाढ) Samruddhi Mahamarg Toll Rates

संपूर्ण ७०१ किमी प्रवासासाठी किती टोल कट होईल?

हलक्या वाहनांसाठी 1,717.45 रुपये (1,444.06 रुपयांवरून वाढ)
हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी 2,775.96 रुपये (2,327.32 रुपयांवरून वाढ)
2-अ‍ॅक्सल जड वाहनांसाठी 5,818.30 रुपये (4,885.97 रुपयांवरून वाढ)
3-अ‍ॅक्सल जड वाहनांसाठी 6,344.05 रुपये (5,327.60 रुपयांवरून वाढ)
अवजड बांधकाम यंत्रसामग्रीसाठी 9,127.02 रुपये (7,661.93 रुपयांवरून वाढ)
मोठ्या आकाराच्या वाहनांसाठी 11,103.84 रुपये (9,323.30 रुपयांवरून वाढ)

दरम्यान, मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे कनेक्टिव्हिटी चांगलीच वाढली आहे. हा महामार्ग 10 जिल्ह्यांतून (नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे) आणि 390 गावांतून जातो. तसेच तो 24 जिल्ह्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जोडतो, विशेषत: विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने हा महामार्ग महत्वाचा ठरला आहे. 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास आता ८ तासात पुर्ण होईल. समृद्धी महामार्गावर 50 पेक्षा जास्त उड्डाणपूल, 24+ इंटरचेंज, 30 भुयारी मार्ग, 56 टोल बूथ बसवण्यात आले आहेत.