Samsung Galaxy A04 : 50 MP कॅमेरा, 5,000mAh च्या बॅटरीसह Sumsung ने लॉन्च केला दमदार मोबाईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता (Samsung Galaxy A04) कंपनी सॅमसंगने आपला नवा मोबाइल Galaxy A04 लॉन्च केला आहे. हा मोबाईल म्हणजे मागील वर्षी लॉन्च केलेल्या Galaxy A03 चे पुढचे व्हर्जन आहे. सॅमसंगच्या या मोबाईलला 50 MP कॅमेरा आणि 5,000mAh ची दमदार बॅटरी आहे. चला जाणून घेऊया या मोबाईलचे अन्य फीचर्स आणि किंमत…

 6.5-इंचाचा डिस्प्ले-

Samsung च्या (Samsung Galaxy A04) मोबाईलच्या वैशिष्ट्यांबाबतीत बघायचं झाल्यास, या स्मार्टफोनला Infinity-V नॉचसह 6.5-इंचाचा LCD डिस्प्ले आहे जो HD+ रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. Galaxy A04 हा मोबाईल फोन Android 12 वर आधारित One UI Core 4.1 वर काम करतो. मोबाईलची लांबी 164.4 मिमी, रुंदी 76.3 मिमी, जाडी 9.1 मिमी आणि वजन 192 ग्रॅम आहे.

Samsung Galaxy A04

50 MP कॅमेरा- (Samsung Galaxy A04)

कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर या (Samsung Galaxy A04) स्मार्टफोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 50 मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेरासह 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. त्याच वेळी, व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A04

5,000mAh ची दमदार बॅटरी-

या मोबाईल ला 4 GB/ 6GB/ 8GB पर्यंत RAM आणि 32 GB/ 64GB/ 128GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजचा पर्याय आहे. सॅमसंग चाय या (Samsung Galaxy A04) स्मार्टफोनला 5,000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट, 4G VoLTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ 5.0, GPS, USB टाइप C आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. सॅमसंगने अजून तरी या Galaxy A04 ची किंमत आणि उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.परंतु या मोबाईलची किंमत 169 युरो म्हणजेच 13,412 रुपये असू शकते.

हे पण वाचा : 

Motorola Edge 30 Ultra : 200MP कॅमेराचा पहिला मोबाईल भारतात लवकरच लॉंच होणार; काय असेल किंमत

Vivo चा बजेट स्मार्टफोन लॉन्च; किंमत 11 हजारांहून कमी

Vivo V25 Pro : 64MP कॅमेरावाला Vivo चा दमदार मोबाईल लाँच; पहा फीचर्स आणि किंमत

Realme 9i 5G : 5,000 mAh बॅटरी, 50 MP कॅमेरा..; Realme चा दमदार मोबाईल लॉन्च

iQOO 9T : लवकरच लॉन्च होणार iQOO चा दमदार मोबाइल; पहा किंमत आणि फीचर्स