पुणे प्रतिनिधी
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राजकीय जागृती वाढावी आणि महाविद्यालय स्तरापासून नेतृत्व तयार व्हावे यासाठी भारिप बहुजन महासंघ प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलन शाखेचं उद्घाटन शाहु महाविद्यालय,पर्वती परिसरात सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर/जिल्हाध्यक्ष मा.शुभम चव्हाण यांच्या सह आल्हाट ताई, नाईकनवरे ताई, कांबळे ताई, वैभवी घाडगे ताई यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये उदघाटन समारंभ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पार पडला.
त्यावेळी भारिप बहुजन महासंघाचे माजी शहर उपाध्यक्ष मा.ज्ञानेश्वर चव्हाण, मा.दादा बनसोडे आणि “सम्यक विद्यार्थी आंदोलन” चे शहर उपाध्यक्ष ऋषीकेश वाघमारे, कायदेशीर सल्लागार ऍड. अमित गायकवाड, शहर उपाध्यक्ष सुरज गोऱ्हे, पिं.चिं. शहर अध्यक्ष मा संतोष जोगदंड,शहर संघटक अमर क्षीरसागर, शहर सचिव अविनाश लहाडे, सहप्रसिद्धी प्रमुख प्रचारक मा.अक्षय बचुटे गोटेगावकर, अतुल गवळी, मा.गौतम ललाकारे, मा.अतुल गवळी, प्रभाकर सरवदे, अभिषेक तागडे, आदेश धीमधीमे या सह अनेक सम्यक वि.आं.चे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयीन तरुण तरुणीना पदांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
सम्यक विद्यार्थी आंदोलन , शाखा-शाहू कॅम्पस
नुतन पदाधिकारी कार्यकारणी खालील प्रमाणे
अध्यक्ष :- सिद्धांत धेंडे
उपाध्यक्ष :- प्रथमेश कांबळे
सचिव :- रेवती पाटील
संघटक :- संदीप घोडके
सहसंघटक :- ऋतुजा क्षीरसागर
सहसचिव :- आयुष गावंडे
खजिनदार :- विशाल धिवार
प्रसिद्धी प्रमुख :- प्रतीक दिंडोकार
सदस्य :- मोहित कांबळे, अमित तोडकर, सुनिधी चौगुले, अनुष्का भिसे, विकास साळवे, अक्षदा देवकाटे,तपस्या मेरुकर