कोरेगावात वाळू चोरी पकडली : ट्रक्टरसह 3 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

कोरेगाव | कोरेगावातील दोघांना विनापरवाना वाळू वाहतूक करताना पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातील वाळू व ट्रॅक्टर, असा 3 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विशाल राजू फुलारे व विकास माने (दोघेही रा. जळगाव रोड, कोरेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात सहायक फौजदार केशव महादेव फरांदे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल (ता. 26) पोलिस निरीक्षक मोरे, सहायक फौजदार फरांदे, चालक पोलिस कॉन्स्टेबल बाबर शासकीय वाहनातून कोरेगाव शहर व अन्य पोलिस ठाण्याच्या हद्दीत विभागीय रात्रगस्त घालत होते. दरम्यान, पहाटे सव्वाचारच्या सुमारास सातारारोड ते कोरेगाव रोडवर भाकरवाडी गावच्या एसटी स्टँडजवळ ट्रॅक्टर (एमएच- 11 बीए- 4785) व ट्रॉली कोरेगाव बाजूकडे येताना दिसली. ट्रॉली तपासली असता, त्यामध्ये वाळू असल्याचे आणि ट्रॅक्टरचालक विशाल फुलारे व विकास माने यांच्याकडे वाळू उत्खनन व वाहतुकीचा परवाना नसल्याचे निदर्शनास आले.

याबाबतची चौकशी करत असताना विकास माने अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेला. ट्रॅक्टर, ट्रॉली ही विकास माने याच्या मालकीचा असून, त्यावर मी रोजंदारीवर काम करतो आणि आम्ही ट्रॉलीमध्ये भरलेली वाळू चांदवडी येथील नदीपात्रातून काढून आणल्याचे विशाल फुलारे याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, दोघाही