सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,
खानापूर तालुक्यातील कुर्ली येथील दोन गटांत जोरदार राडा झाला. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी विटा पोलिस ठाण्यात फिर्यादी दिल्या आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांतील १३ जणांविरूध्द विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी लक्ष्मण शिंदे आणि सुरज कुंभार यांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत.
हे पण वाचा -
या राड्याप्रकरणी एका गटातील सुरज कुंभार, अमित उर्फ चिक्या संपत पाटील, समाधान पाटील, निरंजन सुतार, दादासाहेब पाटील, अजय डिसले, प्रशांत धोंडीराम शिंदे तर दुसऱ्या गटातील लक्ष्मण भगवान शिंदे, सचिन भानुदास शिंदे, दिपक जाधव, रेवणनाथ पिसाळ, उध्दव शिंदे व नारायण कोंडीबा शिंदे अशा एकूण १३ जणांविरूध्द विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी लक्ष्मण शिंदे यांनी विटा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कुर्ली ग्रामपंचायतीजवळ पालखी पाहण्यासाठी गेलो असताना सुरज कुंभार, अमित उर्फ चिक्या संपत पाटील यांनी तू विरोधक आहेस तुझ इथ कायम काम आहे, असे म्हणत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. त्यावेळी तिथे आलेल्या समाधान पाटील, निरंजन सुतार, दादासाहेब पाटील, अजय डिसले, प्रशांत शिंदे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर सुरज कुंभार याने हातातील कोयत्याने मारहाण करून डाव्या हातास जखम केली. तर अमित उर्फ चिक्या पाटील याने पाठीमागून येवून काठीने पाठीत मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Get real time updates directly on you device, subscribe now.
Prev Post