Thursday, February 2, 2023

शेतमजुराची धारदार शस्त्राने वार करून हत्या, सांगलीमधील घटना

- Advertisement -

सांगली : हॅलो महाराष्ट्र – कडेगांव तालुक्यातील तडसर या गावात धनाजी भीमराव कोळी या शेतमजुराची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. हि घटना बुधवारी दुपारी घडली आहे. या प्रकरणातील आरोपी अजून फरार आहे. त्याबाबत चिंचणी- वांगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण
कुंडलमधील शेतमजूर धनाजी कोळी हे तडसर या गावी शेतीच्या कामासाठी गेले होते. यानंतर बुधवारी त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्या ठिकाणच्या माळी वस्तीतल्या उसाच्या शेतात त्यांचा खून करण्यात आला आहे. धनाजी कोळी यांच्या उजव्या कानाच्या मागे डोक्यात आणि कपाळावर समोरील बाजूस धारदार शस्त्राने वार करण्यात आला आहे.

- Advertisement -

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या ठिकाणचा पंचनामा केला आहे. धनाजी कोळी यांच्या हत्येप्रकरणी तानाजी ज्ञानू कोळी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या हत्येमागचे कारण अजून समजू शकले नाही. चिंचणी वांगी पोलिसांकडून या घटनेचा शोध घेण्यात येत आहे.