मातोश्रीचे दार पुन्हा उघडले, तर मी नक्की जाईन; ‘या’ बंडखोर आमदाराने केलं मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, मंत्रीमंडळ विस्ताराला वेळ असल्याने बंडखोर आमदार आता त्यांच्या मतदार संघात दाखल झाले आहेत. यामध्ये असलेले दिग्रज दारवा मतदारसंघातील बंडखोर आमदार संजय राठोड यांनी मतदार संघात पोहचतात मोठं विधान केले आहे. “आम्ही आजही शिवसेनेतच आहोत. आम्हाला आशा आहेत की, मातोश्रीचे दार आज नाही तर 6 महिन्यानंतर आमच्यासाठी उघडतील. त्यावेळी आम्ही मातोश्रीवर नक्की जाऊ,” असे राठोड यांनी म्हंटले आहे.

संजय राठोड हे आपल्या यवतमाळ येथील जनसंपर्क कार्यालयात आज दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमची भूमिका ही हिंदुत्ववादीचीच आहे. आम्ही कालही होतो आणि आजही शिवसेनेतच आहोत. आम्हाला आशा आहेत की, मातोश्रीची दारं आमच्यासाठी उघडतील. त्यावेळी आम्ही मातोश्रीवर नक्की जाऊ, असे घरवापसीबाबत राठोड यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, आम्ही बंडखोरी केली. आणि आमच्यावर बंडखोरची वेळ का आली. कुणामुळे आम्ही निघून गेलो? यामागचे खरे कारण हे संजय राऊत हेच आहेत. राऊतांमुळेच आम्ही बंडखोरीचा मार्ग स्वीकारला असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment