Wednesday, October 5, 2022

Buy now

“सोमय्या दलाल, लफ़ंगा अन् चोर, हजारो कोटींचा घोटाळा केला”; संजय राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. दरम्यान राऊत यांच्याकडून अजूनही सोमय्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांनी आज माध्यमांशी साधत पुन्हा हल्लाबोल केला. सोमय्या हा चोर, दलाल अन् लफ़ंगा आहे. त्याने केंद्रीयमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने हजारो कोटींची वसुली केली आहे, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्याप्रमाणं महा आयटी घोटाळ्यातील लोकांना पळवून लावल्याची माहिती आहे. अमोल काळे, विजय रहांगळे कुठं आहेत? हे केंद्र सरकारला विचारणार आहे. पेरुबाग पासपोली येथील आयआयटी पवईचा 138 चा भूखंड साफ करुन घेतला. पूनर्वसनाच्या नावाखाली 433 बोगस लोकांना आत घुसवले आहे. त्या लोकांचा संबंध नसताना किरीट सोमय्यांच्या लोकांनी त्यामध्ये आत घुसवले आहे. खऱ्या बाधितांना धमकावले जात आहे.

पवई पेरु बाग प्रकल्पाच्या अंतिम यादीवर त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली. 433 लोकांकडून 25 लाख रुपये घेण्यात आले. हा 200 ते 300 कोटींचे प्रकरण आहे. ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखा यांना ही कागदे दाखवत आहोत. किरीट सोमय्या सांगायचे की देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर 50 कोटी उकळले. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर किरीट सोमय्यांनी घेतले. हा घोटाळा 400 कोटींचा असल्याची आम्हाला शंका आहे, असे राऊत याणी यावेळी म्हंटले.