किरीट सोमय्या महाराष्ट्राविरुद्ध कारस्थाने करतात आणि केंद्राकडून त्यांना….; राऊतांची ‘रोखठोक’ टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे महापालिका आवारात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकानी हल्ला केला. या घटनेत सोमय्या जखमी होऊन त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर भाजप आणि शिवसेनेत आरोप- प्रत्यारोप होत असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या महाराष्ट्राच्या सरकारला धमक्या देतात. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची बदनामी करतात. महाराष्ट्राविरुद्ध कारस्थाने करतात आणि हे महान कार्य करत असल्याबद्दल भाजपाच्या केंद्र सरकारने त्यांना केंद्र सरकारची खास ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली आहे. मराठीचे आणि महाराष्ट्राचे शत्रू अशा पद्धतीने भाजपचे केंद्र सरकार पोसत आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली

किरीट सोमय्या सरळसरळ ब्लॅकमेलिंग करतात, असे त्यांचे वर्तन आहे. हे सोमय्या ईडी कार्यालयात जातात व उद्या कुणाला बोलवायचे व दम द्यायचा तो अजेंडा ठरवतात व पुन्हा ते तसे जाहीर करतात, उद्या ईडी कुणाच्या घरी पोहोचणार हे ते आधी जाहीर करतात. त्यानुसार ईडीच्या कारवाया होतात. हे घडत असल्याने मोदी व शहांच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.