हम हार मानने वाले नही, सरकार पुढील अडीच वर्षे पूर्ण करणारच; संजय राऊतांचा बंडखोरांना थेट इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदेसह आमदारांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची स्थिती निर्माण झाली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरले आहे. त्यांनी नुकतीच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल देसाई यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर संजय राऊत यांनीही मोठे विधान केले आहे. “याच वाय बी सेंटर मधून महाविकास आघाडीचा जन्म झाला होता. आता कोण जिंकते ते सभागृहात पहाच. हम हार मानने वाले नही, सरकार पुढील अडीच वर्षे चालेल, असे राऊत यांनी म्हणत बंडखोरांना इशारा दिला आहे.

नुकतीच संजय राऊत यांनी शरद पवार यांनी वाय बी सेंटर येथे जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांच्यात तब्बल तासभर चर्चाही झाली. यानंतर राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारची घोषणा अडीच वर्षांपूर्वी केली होती. आजही आम्ही आता तेच सांगत आहे कि इथून पुढे अजून अडीच वर्षे हे महाविकास आघाडीचे सरकार चालणार आहे. ते आपली पाच वर्षे नक्की पूर्ण करणार आहे.

फक्त कायदेशीर मार्ग नाही तर सर्व प्रकारचे मार्ग अवलंबणार आहोत. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या साक्षीनं आम्ही हार मानणार नाही असं सांगतो. आम्ही सभागृहात जिंकू, जर रस्त्यावर लढाई झाली तर तिथेही जिंकू. ज्यांना आमचा सामना करायचा आहे ते मुंबईत येऊ शकतात. तुम्ही या, आमची पूर्ण तयारी आहे. आता आमचं आव्हान आहे. याच इमारतीमधून महायुतीची घोषणा झाली होती. येथूनच महायुतीचं बंधन बांधण्यात आलं. याच इमारतीमधून मी तुम्हाला महाविकास आघाडी मजबूत असून पुढील अडीच वर्ष पूर्ण करुन पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास यावेळी राऊतांनी बोलून दाखवला.

Leave a Comment