आजची सभा आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप आहे… ; ठाकरेंच्या सभेपूर्वी संजय राऊतांचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री अशा दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पडत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपसह विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान या विरोधकांना उत्तर देण्यासाठी आज सायंकाळी मुंबईतील वांद्रे पूर्व येथे उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे. “उद्धव ठाकरेंची आजची होणारी सभा सभा नसून ती एक क्रांतिकारी सभा असेल, आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा ती बाप असणार आहे. या सभेतून मुख्यमंत्री सर्व प्रश्नांची उत्तर देईलम असे राऊतांनी म्हंटले आहे.

संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणार्याचा समाचारही घेतला. यावेळी राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या मुंबईतील सभांची परंपरा विराट, अतिवराट अशी आहे. आणि आज मुख्यमंत्र्यांची होणारी ही सभा आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप आहे. मुंबईत कोविडच्या काळानंतर इतक्या मोठ्या सभा झालेल्या नाहीत. शिवसेनेचा संपूर्ण कारभार भव्य असतो. आज मैदानात उतरण्याच्या निश्चयाने, जिद्दीने या सभेचे आयोजन केले आहे.

आजची सभा ही फटके देणारी…

यावेळी संजय राऊत यांनी भाजपवरही निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात सध्या विरोधी पक्षाचा नंगानाच सुरु आहे. त्यातून विरोधी पक्षाची मती ही भ्रष्ट झाली आहे. त्यांना वटणीवर आणण्यासाठी आजची मुख्यमंत्र्याची सभा होत आहे. ती सभा टोमणे सभा नसून फटके सभा आहे. या सभेमधील ठाकऱ्यांची भाषा तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला काय माहिती मराठी आणि महाराष्ट्राचा इतिहास?” असा सवाल राऊतांनी यावेळी केला आहे.

कूछ लोग भूल गये है.. अंदाज हमारा !

उद्धव ठाकरे याची मुंबईत आज सभा होणार आहे. त्या जाहीर सभेसाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे. आजच्या सभेतून उद्धव ठाकरे विरोधकांवर आपली तोफ डागणार आहे. तत्पूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक असे ट्विट केले आहे. आणि त्यातून असे वाटते की पुन्हा मैदानात उतरावे लागणार आहे. काही लोक विसरून गेले आहेत आमचा अंदाज. जय महाराष्ट्र आजचा दिवस आहे क्रांतिकारी, ” असे ट्विट राऊतांनी केले आहे.

Leave a Comment